गारपीटग्रस्तांना २०० कोटींची मदत

By Admin | Updated: June 3, 2015 03:55 IST2015-06-03T03:55:57+5:302015-06-03T03:55:57+5:30

राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत

200 crore aid to hailstorm affected people | गारपीटग्रस्तांना २०० कोटींची मदत

गारपीटग्रस्तांना २०० कोटींची मदत

मुंबई : राज्यात दोन महिन्यांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना २०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. हा निधी शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात येणार असून, या निधीतून कोकण विभागातील आंबा व काजू उत्पादकांना ६९ कोटी ८५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. विशेषत: नाशिक भागातील द्राक्षे, खान्देशातील केळी आणि फळभाज्या, विदर्भ वगळता उर्वरित भागातील रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला
होता. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 200 crore aid to hailstorm affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.