उल्हासनगरमध्ये २० वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: May 10, 2014 18:56 IST2014-05-10T18:54:56+5:302014-05-10T18:56:02+5:30

उल्हासनगरमध्ये घरकाम करणा-या २० वर्षीय तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

A 20-year-old girl raped by a gang rape in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये २० वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार

उल्हासनगरमध्ये २० वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार

>ऑनलाइन टीम
ठाणे, दि. १० -  उल्हासनगरमध्ये घरकाम करणा-या २० वर्षीय तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरूणी काल संध्याकाळी बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडली असता तीन तरूण तिला उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांत एक परिसराजवळील ममता हॉस्पिटलच्या मागील निर्जन स्थळी घेऊन गेले व त्यांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही तरूणी उल्हासनगर येथेच एका चाळीत राहते व घरकाम करते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: A 20-year-old girl raped by a gang rape in Ulhasnagar