वीज कोसळून राज्यात 20 ठार
By Admin | Updated: August 22, 2014 01:21 IST2014-08-22T01:21:35+5:302014-08-22T01:21:35+5:30
राज्याच्या काही भागांत गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ विविध ठिकाणी वीज कोसळून 20 जण ठार झाल़े

वीज कोसळून राज्यात 20 ठार
मुंबई : राज्याच्या काही भागांत गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ विविध ठिकाणी वीज कोसळून 20 जण ठार झाल़े यामध्ये विदर्भातील 15, नांदेडमधील चार आणि भुसावळच्या एका महिलेचा समावेश आह़ेतर विदर्भात अनेक ठिकाणी जनावरेदेखील दगावली़
यवतमाळच्या महागाव व पुसद च्या प्रत्येकी तिघांचा, वर्धा जिलत हिंगणघाट तालुक्यात शेतमजूर महिलेचा, चंद्रपूर जिलतील वरोरा तालुक्यात एक शेतक:याचा व राजुरा तालुक्यात दोन महिलेचा समावेश असून, बुलडाणा जिलतही दोन महिला आणि नागपूरच्या उमरेड तालुक्यात तिघांचा असे विदर्भात एकूण 15 जण ठार झाल़े नांदेडच्या भोकर तालुक्यात वीज अंगावर पडून आई व मुलाचा मृत्यू झाला़, तर हदगाव आणि माहूर तालुक्यात प्रत्येकी एका महिलेचा मृत्यू झाला़
उमरेड तालुक्यातील ओमेश्वर अलाम (24) व विनोद सलाम (2क्), सुलोचना लांजेवार (62), महागाव तालुक्यातील गजानन जाधव (24), संतोषे दातकर (3क्) आणि रेखा शिंदे (4क्) व पुसदमधील संभाजी शेळके (4क्), किशोर राठोड (18), तुकाराम पवार (55), हिंगणघाट तालुक्यातील सुनिता गायकवाड, राजुरा तालुक्यातील सरस्वती खवसे (6क्),वंदना तोडासे (38), वरोरा तालुक्यातील विलास बुरेले (32), तर बुलडाण्याच्या सोनु अवदगे (2क्) व सुमित्र बोरे (55) यांचा मृतांमध्ये समावेश आह़े भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवारात वीज कोसळून इंदुबाई पाटील (6क्) यांचा मृत्यू झाला़ नांदेडच्या भोकर तालुक्यातील कौशल्याबाई वागदकर (35) या मुलगा शिवदर्शन (6) यांच्यावर वीज कोसळली. हदगावमध्ये चंद्रकला देशमुखे यांचा तर माहूर तालुक्यातील सत्यभामा मुंडे (28) यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला़