मायक्रो फायनान्स कंपनीकडून २० कोटींची फसवणूक
By Admin | Updated: November 18, 2014 02:25 IST2014-11-18T02:25:10+5:302014-11-18T02:25:10+5:30
मायक्रो फायनान्स पब्लिक लिमिटेड कंपनीने अनेक ग्राहकांची फसवणूक करून कंपनीला टाळे लावले आहे.

मायक्रो फायनान्स कंपनीकडून २० कोटींची फसवणूक
चाळीसगाव (जळगाव) : मायक्रो फायनान्स पब्लिक लिमिटेड कंपनीने अनेक ग्राहकांची फसवणूक करून कंपनीला टाळे लावले आहे.
कंपनीने जिल्ह्यातून सुमारे २० कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांकडून जमा केल्या आहेत.
मुदत संपूनही ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने ५० ते ६० ग्राहकांनी चाळीसगाव पोलिसांत तक्रार दिली. चाळीसगाव येथे कंपनीचे उपविभागीय कार्यालय आहे. जळगाव, नशिक, धुळे, नंदुरबार, पाचोरा, कन्नड, नांदगाव, पारोळा येथेही कंपनीच्या शाखा आहेत. चाळीसगावसह इतर शाखांमध्ये सुमारे १५ हजार ठेवीदारांचे खाते आहेत. कंपनीमध्ये ग्राहकांनी २५ हजार ते पाच लाखांपर्यंत ठेवी घेऊन गुंतवणूक केलेली आहे. (प्रतिनिधी)