शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाला २ आठवड्याची मुदत? आमदार अपात्रतेचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:10 IST

यासंदर्भात दोन्ही गटांच्या ५१ आमदारांना अध्यक्षांनी नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

मुंबई : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे. मात्र प्रत्यक्षात अध्यक्षांना सुनावणीसाठी मिळणारा वेळ अत्यंत कमी असल्याने या गटाला किती मुदतवाढ द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काहीही केले तरी अजित पवार गटाला दोन आठवड्यांपेक्षा अधिक मुदत देता येणार नाही यावर विधिमंडळ सचिवालयाचे एकमत झाले आहे.

शिवसेनेपाठोपाठ आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतही दोन गट आमने-सामने आले आहेत. पक्षशिस्त मोडल्याने अजित पवार गटाच्या आमदारांवर कारवाई करून अपात्र ठरवा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती.

यासंदर्भात दोन्ही गटांच्या ५१ आमदारांना अध्यक्षांनी नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही कोणतीही शिस्त मोडली नसल्याचे कारण देत शरद पवार गटाने आपले म्हणणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले आहे. अजित पवार गटाने मात्र आपले म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली आहे. 

३१ जानेवारी  २०२४ पर्यंत निर्णय  शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय द्यायचा आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया हिवाळी अधिवेशन काळातच सुरू केली जाणार आहे. राष्ट्रवादीची सुनावणी संपवून ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे अजित पवार गटाला एक महिन्याऐवजी दोन आठवड्यांची मुदत दिली जाणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार