पुण्यात मस्तानी तलावात बुडून २ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: November 22, 2015 18:55 IST2015-11-22T14:04:17+5:302015-11-22T18:55:44+5:30
पुण्यातील मस्तानी तलावात बुडाल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली.

पुण्यात मस्तानी तलावात बुडून २ जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - पुण्यातील हडपसर वडकीनाला येथील मस्तानी तलावात बुडाल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. मृतांपैकी एका तरूणाचे अवघ्या काही दिवसांतच लग्न होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री काही तरूण बॅचलर्स पार्टीसाठी तलावाजवळ आले होते. आज सकाळी सहाच्या सुमारास ते मस्तानी तलावात पोहायला उतरले, मात्र थट्टा-मस्करीच्या नादात त्यांना पाण्याच अंदाज आला नाही. त्यामुळे पोहता न येणारे दोघे जण पाण्याच्या प्रवाहामुळे आत ओढले जाऊन बुडाले, तर इतर तिघे कसेबसे पोहत बाहेर आले.
बुडालेल्यांपैकी एका तरूणाचे नाव सुनील गायकवाड (वय २६) असल्याचे समजते. पोलिस व अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोचले असून मृतदेह शोधण्यासआटी एक बोट तलावात उतरवण्यात आली आहे.