शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:06 IST

Lok Sabha Elections 2024 : काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे. 

अमरावती : देशात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यातच अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे. 

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असे बच्चू कडू म्हणाले. २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची, असा टोला राणा दाम्पत्याला लगावत १७ रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, १७ रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राणा दाम्पत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र या साड्या पाहून तेथील आदिवासी महिला चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला होता. तसेच, या साड्या वाटपावरून मेळघाटामध्ये चांगलंच वातावरण तापले होते. त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे. 

नवनीत राणांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारीअमरावती लोकसभेसाठी नववीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच केली होती. पण भाजपने नववीत राणांना संधी दिली. त्यामुळे महायुतीत असलेले बच्चू कडू नाराज झाले. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुनाच असून एकमेकांच्यात विस्तवही जात नसल्याची परिस्थिती आहे. त्याचमुळे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली. दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले आहे. तसेच, या जागेवर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे देखील इच्छुक होते. पण, ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ देखील नाराज आहेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४