‘डीपी’वर १९८ आक्षेप

By Admin | Updated: June 10, 2016 05:28 IST2016-06-10T05:28:09+5:302016-06-10T05:28:09+5:30

सुधारित विकास नियोजन आराखडा २०१४ ते २०३४ पालिकेच्या संकेतस्थळावर टाकल्यानंतर आठवड्याभरात १९८ तक्रारी व सूचना जमा झाल्या

1989 objections to 'DP' | ‘डीपी’वर १९८ आक्षेप

‘डीपी’वर १९८ आक्षेप


मुंबई: सुधारित विकास नियोजन आराखडा २०१४ ते २०३४ पालिकेच्या संकेतस्थळावर टाकल्यानंतर आठवड्याभरात १९८ तक्रारी व सूचना जमा झाल्या आहेत़ यापैकी तब्बल १५४ हरकती तक्रारदारांनी प्रत्यक्ष महापालिकेकडे नोंदविल्या आहेत़ तर ४४ सूचना आॅनलाईन आल्या आहेत़ २७ जुलैपर्यंत नागरिकांना तक्रारी नोंदविता येणार आहे़
२० वर्षांचा विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार
करण्यात आला आहे़ यापूर्वी
तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये असंख्य त्रुटी आढळल्या़ यावर तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या आराखड्याचा सुधारित मसुदा तयार करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 1989 objections to 'DP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.