१९ जणांना जेवणातून विषबाधा

By Admin | Updated: May 10, 2017 03:10 IST2017-05-10T03:10:10+5:302017-05-10T03:10:10+5:30

कर्जत कशेळे येथे सोमवारी रात्री हळदी समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांची तब्येत खालावली होती. त्यांना त्वरित कशेळे ग्रामीण रूग्णालयात हलवले.

19 people got food poisoning | १९ जणांना जेवणातून विषबाधा

१९ जणांना जेवणातून विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत कशेळे येथे सोमवारी रात्री हळदी समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांची तब्येत खालावली होती. त्यांना त्वरित कशेळे ग्रामीण रूग्णालयात हलवले.
सोमवारी रात्री कशेळे येथे हळदी समारंभ सुरू होता. या वेळी केलेल्या भोजनामध्ये मशरूमच्या भाजीचा समावेश होता. पाहुण्यांनी ही भाजी खाल्ल्यावर त्यांना मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या. त्यांना लगेच रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण हंकारे यांनी त्यांची उपचार केले. सोमवारी रात्री दाखल केलेल्या १९ रु ग्णांपैकी १८ रु ग्णांना मंगळवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर एका रु ग्णावर अजूनही उपचार सुरू आहेत.
जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांना दाखल केले होते. त्यातील १८ जणांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाल्याचे कशेळे ग्रामीण रूग्णालयातील डॉ. बाळकृष्ण हंकारे यांनी सांगितले.

Web Title: 19 people got food poisoning