बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित

By Admin | Updated: September 2, 2015 02:17 IST2015-09-02T02:17:41+5:302015-09-02T02:17:41+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

19 officers suspended in the construction department | बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित

बांधकाम खात्यातील १९ अधिकारी निलंबित

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वांद्रे व अंधेरी उपविभागात अधिकारी-कंत्राटदारांनी संगनमत करून कामांचे बनावट चाचणी अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून,
१८ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले.
बांधकाम विभागाच्या दोन उपविभागांमध्ये २०११ ते २०१४ या चार वर्षांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या २९ कामांमध्ये वापरलेल्या साहित्याबाबतचे चाचणी अहवाल नियमानुसार विभागाच्या प्रयोगशाळेने द्यावयास हवे होते. त्याऐवजी बनावट अहवाल तयार करून बिले सादर करण्यात आली. पैसा उचलण्यात आला आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची बाब समोर आली आहे. महालेखापालांनी या साहित्य चाचणी अहवालांतील अनियमिततेवर बोट ठेवल्यानंतर विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाने चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार बांधकाम साहित्याचे चाचणी अहवाल विभगाच्या तुर्भे येथील प्रयोगशाळेने दिलेच नसल्याचे स्पष्ट झाले. खोटे अहवाल जोडण्यात आले. या अहवालाच्या आधारे अधिकाऱ्यांवर निलंबनाची तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. १९ अधिकारी, १८ कंत्राटदार तसेच दोन निवृत्त अधिकारी उपअभियंता ए.एस.बोरसे, उपअभियंता टी.जी.बंड यांची विभागीय चौकशी करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
काळ्या यादीत टाकण्यात आलेले कंत्राटदार
१)सय्यद सिद्धिकी नासिर अली, २)किरण चंद्रकांत हाडवळे, ३)काझी मोहम्मद रेहाना. मजूर सहकारी संस्था अशा - ४) गीतांजली ५) प्रभात, ६)अभिनव,७) गिरनार ८) माता रमाई ९) श्री तिरुपती १०)श्री स्वामी विवेकानंद ११) दर्शना, १२) शिवसाई १३) नवोदय १४) मिलिंद १५) समीर १६)श्री गणेश कामगार १७) चारकोप गावकर, १८) चंद्रमणी.

Web Title: 19 officers suspended in the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.