शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: September 24, 2025 14:21 IST

लवकरच संबधितांच्या खात्यावर पैसे वर्ग

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या वीस जिल्ह्यांतील १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांना १३३९ कोटी ४९ लाख रुपयांच्या मदतीला शासनाने मान्यता दिली आहे. तातडीने हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.राज्यात यंदा मान्सूनपूर्व सह मान्सूनमधील पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषत: मराठावाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, यामध्ये खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी उघड्यावर पडला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यांना तत्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.

राज्यात १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांचे तब्बल १५ लाख ४५ हजार २५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या क्षेत्राला शासकीय नियमानुसार १३३९ कोटी ४९ लाख रुपये मदत दिली असून, त्याला शासनाने मान्यता दिली आहे.दरम्यान, चार दिवसांपूर्वीच नांदेड, परभणी, सातारा व सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ६८९.५२ कोटी रुपयांच्या मदतीला सरकारने मान्यता दिली आहे.

हंगामात एकच वेळी मदत मिळणार

यंदा मे महिन्यात अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले होते. त्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तेही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे मदत दिली, याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली आहे.

जिल्हानिहाय अशी मिळणार मदत..

जिल्हा शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर) मदत निधी (कोटीत) 
अमरावती १,६८,५३३ १,२३,७६३ १०८.७१
अकोला ११,५९७ ७,३१० ६.२१ 
यवतमाळ २,२६,६५२ २,१०,८४५ १८३.४२ 
बुलढाणा १,८०,३६८ १,४३,३८९ १२१.८९ 
वाशिम २,०१,८२४ १,६९,२८४१४५.३५ 
गोंदिया ३५६ २५८ ०.२३ 
भंडारा ८,२८३ २,५८९ ४.३३ 
गडचिरोली १८,३०७ १०,९११ १२.८९ 
वर्धा ९,१०७ ६,३८० ५.४२ 
नागपूर १,५७८ १,०८३ ०.९६ 
कोल्हापूर ३६,५५९८,८३५ १४.२८ 
हिंगोली ३,०४,८२९ २,७१,५८६ २३१.२७ 
बीड १,१४,७७३ ६६,७३१ ५६.७३ 
लातूर ३,८०,५११ २,८७,१५१ २४४.३५ 
धाराशिव २,३४,९५५ २,२२,९७५ १८९.६० 
नाशिक ७,१०८ ४,०१४ ३.८१ 
धुळे ७२ २३ ०.०२ 
नंदुरबार २५ ११ ०.०१ 
जळगाव १७,३३२ ८,०२७ ९.८६ 
आहिल्यानगर १४० ७१ ०.०६