19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक
By Admin | Updated: March 25, 2017 15:49 IST2017-03-25T15:47:54+5:302017-03-25T15:49:43+5:30
विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन टप्प्यात हे निलंबन रद्द करण्यात येऊ शकते. 29 मार्चला काही आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येऊ शकते. राज्य विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरु असताना शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता.
आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना आग्रही होती. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला होता.