शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:16 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहाअंतर्गत निर्णय

भारत सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त करावयाच्या समारोहाचा भाग म्हणुन विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र बंद्यांना विशेष माफी देणे बाबत केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत  निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र कारागृह  विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री. अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर यांनी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या समारोहातंर्गत स्वातंत्र्यदिनी राज्यातील कारागृहातून सुटका होणाऱ्या  186 बंद्यांना “गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे” आवाहन केले व  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन मंगळवारी (ता.15) साजरा करण्यात येणार असून ,देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत.

“माफी योजनेचा उद्द्येश हा कैद्यांमध्ये शिस्त आणि आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे.” केंद्रीय गृह सचिवालयाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बंद्यांचे विशेष माफी योजनेसाठी पात्रता तपासण्यासाठी दिनांक 09जून 2022 च्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिव(अ . व सु. ),गृह विभाग,मंत्रालय यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्यांच्या प्रस्तावास मा. राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.

अश्या प्रकारे तीन टप्प्यांमध्ये एकूण 581 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी २०६ बंदी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189बंदी, कारागृहातून मुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या बंद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60वर्ष पूर्ण केलेले पुरुष बंदी ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7बंदी आहेत. तरुण गुन्हेगार 12ते 21 वर्षे वयात गुन्हा केला त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 10 बंदी आहेत. निर्धन आणि दीन बंदी ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 बंदी. एकूण शिक्षेचा कालावधी पैकी दोन तृतीयांश अथवा 66टक्के कालावधी पूर्ण करणारे 167बंदी आहेत.

राज्यातील कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी पुढीलप्रमाणे-

  • 1.. येरवडा मध्यवर्ती कारागृह 16
  • 2. येरवडा खुले कारागृह 1
  • 3. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह 34
  • 4. ठाणे मध्यवर्ती कारागृह 1
  • 5. नागपूर मध्यवर्ती कारागृह 23
  • 6.अमरावती खुले कारागृह 5
  • 7.अमरावती मध्यवर्ती कारागृह 19
  • 8.कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 5
  • 9. कोल्हापूर खुले कारागृह 5
  • 10.जालना जिल्हा कारागृह 3
  • 11. पैठण खुले कारागृह 2
  • 12.औरंगाबाद खुले कारागृह 2
  • 13.औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह 24
  • 14. सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह 13
  • 15.मुंबई मध्यवर्ती कारागृह 7
  • 16. तळोजा मध्यवर्ती कारागृह 8
  • 17. अकोला जिल्हा कारागृह 6
  • 18. भंडारा जिल्हा कारागृह 1
  • 19.चंद्रपूर जिल्हा कारागृह 2
  • 20. वर्धा जिल्हा कारागृह 2
  • 21. वर्धा खुले कारागृह 1
  • 22. वाशीम जिल्हा कारागृह 1
  • 23. मोर्शी खुले कारागृह 1
  • 24.गडचिरोली खुले कारागृह 4
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रjailतुरुंग