शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०१ प्रकल्पांत १८.५५ टक्के पाणीसाठा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:07 IST

पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

-संदीप मानकर अमरावती - पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, एप्रिल ते जून असे तीन महिने प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २०.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत २४.२४ टक्के आणि ४६९ लघुप्रकल्पांत १२.५८ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे. ५०१ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ६११.१२ दलघमी शिल्लक आहे. विभागातील अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत २२.४० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सरासरी २५.५२ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १७.४९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ११.२ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सर्वात कमी ५.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

आठ मोठ्या प्रकल्पांची पाणीसाठा स्थितीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत २०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३३.३२ टक्के, अरुणावती प्रकल्पात १९.९३ टक्के, बेंबळा प्रकल्पात २३.८५ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २०.४७ टक्के, वान प्रकल्पात सर्वाधिक ४०.७७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ९.९७ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ०.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची झळ आतापासून जाणवू लागली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई