राज्यातील १८४ जण काश्मीरमध्ये बेपत्ता!
By Admin | Updated: September 12, 2014 02:56 IST2014-09-12T02:56:19+5:302014-09-12T02:56:19+5:30
राज्यातील १८४ पर्यटकांचा काश्मीरमधील पुरामध्ये अद्याप पत्ता लागलेला नाही. इतर १२२ पर्यटकांचा शोध लागला असला तरी ते अजून घरी परतू शकलेले नाहीत

राज्यातील १८४ जण काश्मीरमध्ये बेपत्ता!
मुंबई : राज्यातील १८४ पर्यटकांचा काश्मीरमधील पुरामध्ये अद्याप पत्ता लागलेला नाही. इतर १२२ पर्यटकांचा शोध लागला असला तरी ते अजून घरी परतू शकलेले नाहीत.
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत सातत्याने माहिती घेत आहे. पर्यटक म्हणून काश्मीरला गेलेल्यांचे नातेवाईक हवालदिल झाले असून सातत्याने शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहेत. राज्य शासनाने मदतीसाठी तीन जणांचे पथक काश्मीरला पाठविले आहे. त्यात वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. बहुतेक प्रवासी हे पहेलगाममध्ये अडकले आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीचे १२२ कर्मचारी अद्याप मुंबईत परतू शकलेले नाहीत, पण त्यांच्याशी संपर्क झाला असून ते रात्री उशिरा किंवा उद्या परततील, असे कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस स्वत: काश्मीरला गेले आहेत आणि तेथे विविध यंत्रणांशी समन्वय साधून नोकरी वा इतर निमित्ताने तेथे राहत असलेले महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहेत. (विशेष प्रतिनिधी)