शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:21 IST

Palghar fishermen in Pakistan jail: गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाताना समुद्रात चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडणारे पालघर जिल्ह्यातील  १८ मच्छीमार आजही तुरुंगात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाताना समुद्रात चुकून पाकिस्तानची हद्द ओलांडणारे पालघर जिल्ह्यातील  १८ मच्छीमार आजही तुरुंगात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मंजूर केलेल्या मदतीपैकी १६ लाख २० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम देण्याची मागणी जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाने राज्य शासनाकडे केली आहे. 

गुजरातमधील बोटींमधून मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडल्याच्या कारणावरून पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने मासेमारी बोटींना ताब्यात घेऊन मच्छीमारांना तुरुंगात ठेवले आहे. सद्य:स्थितीत १९९ भारतीय मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असून, त्यापैकी १९ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत. अटकेत असलेल्या गुजरातच्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकार दिवसाला ३०० रुपये इतकी आर्थिक मदत देते. मात्र, गुजरात सरकारने महाराष्ट्रातील मच्छीमार खलाशांना ही मदत देण्यास नकार दिल्याने या प्रकरणी शांतता कमिटीचे सदस्य जतिन देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारने अनुदानाला मंजुरी दिली होती.

प्रत्येकी ८१ लाखांची तरतूद

सरकारने  खलाशांच्या अनुदानासाठी १६ लाख २० हजार रुपये मंजूर केले होते. पाकिस्तानी तुरुंगातील मृत विनोद  कौल या मच्छीमाराच्या कुटुंबीयांना त्याच्या अधिवास काळातील पूर्ण रक्कम एक कोटी ६१ लाख; तर उर्वरित १८ मच्छीमार खलाशांना प्रतिदिन ३०० रुपयांनुसार २७० दिवसांचे प्रत्येकी ८१ हजार देण्याची राज्य सरकारने तरतूद केली.

४७ लाखांचा निधी प्रलंबित

सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत अद्याप ४७ लाख १६ हजार रुपयांचा सहायता निधी प्रलंबित आहे. त्याकरिता जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे.  मागणी केलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण तातडीने करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bring back sailors from Pakistan jail, demand to state government.

Web Summary : Palghar's 18 fishermen remain jailed in Pakistan for crossing maritime borders. The state government has approved financial aid, with ₹16.2 lakh disbursed. The fisheries department seeks the remaining funds to support the families. 199 Indian fishermen are currently imprisoned in Pakistan.
टॅग्स :palgharपालघरPakistanपाकिस्तानfishermanमच्छीमार