ट्रक-क्रुझर अपघातात 18 ठार
By Admin | Updated: November 27, 2014 01:54 IST2014-11-27T01:54:32+5:302014-11-27T01:54:32+5:30
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील आठ जण ठार, तर एक गंभीर जखमी झाले आहेत़

ट्रक-क्रुझर अपघातात 18 ठार
अकोला/कुरुम : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील आठ जण ठार, तर एक गंभीर जखमी झाले आहेत़ जखमींवर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील महामार्गावरील मधापुरी फाटय़ाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजता घडली़
माणिक नारायण पाटील (58), अरविंद माणिक पाटील (28), सचिन माणिक पाटील (30), प्रभाकर शेनू बोर्ले (68), वसंत महादेव पाटील (59), भास्कर निळखंड पाटील (65), प्रकाश रामचंद्र पाटील (60), भास्कर राम किंगे (55) अशी मृतांची नावे आहेत़ अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मलकापुरातील तांदूळवाडी येथील माणिक नारायण पाटील यांच्या मुलगा अरविंद (28) याचा विवाह संबंध निश्चित करण्यासाठी पाटील कुटुंब अमरावतीच्या आर्वी येथे सकाळी निघाले होते. अमरावतीहून अकोलाकडे येणा:या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात क्रुझरला धडक दिली. क्रुझरच्या कॅबीनचा चुराडा झाला. जीप 1क्क् फूट फेकली गेली. यात 7 जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले होते. उपवर अरविंद यांचा उपचारदारम्यान मृत्यू झाला. क्रुझरचालक शंकर अभिमन्यू पाटील हा गंभीर जखमी आहेत. (प्रतिनिधी)
ट्रक-ऑटो भीषण अपघातात 7 ठार
चापोली (जि. लातूर) : भरधाव ट्रकने ऑटोला दिलेल्या जोरदार धडकेने झालेल्या भीषण अपघातात सातजण ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली़ ही घटना लातूर जिलतील चाकूर तालुक्यातील चापोलीजवळ बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली़ अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाचजण एकाच कुटुंबातील असून, उर्वरित दोघे त्याच कुटुंबातील मुलगी व जावई आहेत.
मृतांमध्ये जब्बार मलंगसाब शेख (23, ऑटोचालक), एकबाल मलंगसाब शेख (35), मगदूम मलंगसाब शेख (4क्), नजमुनबी मलंगसाब शेख (6क्), खैरुनबी शेख (7क्), रिझवाना हसन पठाण (28), हसन पठाण यांचा समावेश आहे.
खैरुनबी शेख यांना अर्धागवायू झाल्याने त्यांना चापोली येथून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ऑटोमधून देवणी येथील रुग्णालयात नेण्यात येत होत़े दरम्यान, लातूरहून - अहमदपूरकडे जाणा:या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. यात जबार मलंगसाब शेख, एकबाल मलंगसाब शेख, खैरुनबी शेख आणि हसन पठाण हे जागीच ठार झाल़े तर जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच मगदूब शेख, नजमुनबी शेख, रिझवाना पठाण यांचाही मृत्यू झाला़ फरजाना शेख हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े रस्त्यातील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न ट्रकचालकाने ऑटोला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल़े (प्रतिनिधी)
लेकरांचे नशीब बलवत्तर
या अपघातात आजी, आई, तीन भाऊ, बहीण आणि भावजी अशा सात जणांचा मृत्यू झाला़ तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आह़े इरफान आणि समीर या मुलांना मार लागला असला तरी त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े