173 विद्याथ्र्याना विषबाधा

By Admin | Updated: July 25, 2014 01:39 IST2014-07-25T01:39:21+5:302014-07-25T01:39:21+5:30

बिस्किटांतून पाचवी ते सातवीच्या वर्गातील 173 विद्याथ्र्याना विषबाधा झाल्याचा प्रकार वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात गुरुवारी दुपारी घडला.

173 student poisoning | 173 विद्याथ्र्याना विषबाधा

173 विद्याथ्र्याना विषबाधा

वाशी (जि. उस्मानाबाद) : शालेय पोषण आहारातून दिलेल्या बिस्किटांतून पाचवी ते सातवीच्या वर्गातील 173 विद्याथ्र्याना विषबाधा झाल्याचा प्रकार वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात गुरुवारी दुपारी घडला. बाधित विद्याथ्र्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान,  यातील आठ जणांना जास्त त्रस झाल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले होते. मात्र, सर्व विद्याथ्र्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रंनी सांगितले. 
छत्रपती शिवाजी विद्यालयात दर गुरुवारी विद्याथ्र्याना पोषक आहार दिला जातो. त्याप्रमाणो 24 जुलै रोजीही या विद्याथ्र्याना येथील बेकरीतील बिस्किटे खरेदी करून देण्यात आली होती.
 प्रारंभी पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्याथ्र्याना ही बिस्किटे देण्यात आली. परंतु, बिस्किटे खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत या विद्याथ्र्याना पोटात दुखणो, चक्कर येणो असे प्रकार सुरू झाले. ही बाब समजताच प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. लोखंडे व पोषण आहाराची देखभाल करणारे शिक्षक अनिल शेरखाने व त्यांच्या सहका:यांनी विद्याथ्र्याना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केल़े तसेच बिस्किटेवाटप तत्काळ बंद करण्यात आल़े 
बारा विद्याथ्र्याना सलाईन लावण्यात आले असून, 152 विद्याथ्र्याना देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात आले आह़े दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पालकांनी रुग्णालयाच्या परिसरात एकच गर्दी केली होती. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक एन. टी. मुजावर यांनी तातडीने येथे येऊन संबंधित बेकरीतील बिस्किटांचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली; तसेच तपासणीसाठी ती प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. (वार्ताहर)
 
च्विद्याथ्र्याना वाटण्यात आलेल्या बिस्किटांच्या पॉकेटवर पॅकिंग तारीख, एक्सपायरी डेट तसेच या बिस्किटांची निर्मिती कोणी व कोठे केली, याबाबतची कसलीही माहिती नसल्याचे समजते. राजू तेवर यांच्याकडून सदर बिस्किटे खरेदी केली होती, अशी माहिती पोषण आहार बनवणा:या जयमाला गणोश कवडे व सुरेखा नरसिंग उंदरे यांनी दिली.
 
आहार वाटपाचे नियम धाब्यावर
विद्याथ्र्याना देण्यात येणारा शालेय पोषण आहार व पूरक आहार याविषयी निकष आहेत़ मात्र सदरील निकष हे पूर्णपणो धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले. विद्याथ्र्याना कोणते खाद्यपदार्थ द्यायचे, त्याचा दर्जा, कोणत्या दिवशी भाज्या, खिचडी द्यायची, ही माहिती शिक्षकांना असली पाहिजे. मात्र याबाबत शिक्षक अनभिज्ञ होते, असेही काही पालकांनी सांगितले. 

 

Web Title: 173 student poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.