आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द
By Admin | Updated: September 29, 2015 21:03 IST2015-09-29T20:25:00+5:302015-09-29T21:03:58+5:30
वार्षिक लेखापरिक्षण अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगाने आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द केली आहे.

आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९
निवडणूक आयोगाने आरपीआई, स्वाभिमानी शेतकारी संगठनासह महाराष्ट्रातील १६ राजकीय पक्षाची मान्यता रद्द केली आहे. वार्षिक लेखापरिक्षण अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळे मान्यता रद्द करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात मिळालेल्या देणग्या आणि इतर खर्च याचा तपशील निवडणूक आयोगाला देण बंधनकारक आसते. पण या राजकीय पक्षांनी अद्याप तपशील दिला नसल्यामुळे निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेत, राजकीय पक्षांना नोटिसा धाडल्या होत्या. या नोटीसला राजकीय पक्षांनी दिलेलं उत्तर समाधानकार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग १६ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे या पक्षांना एकत्रित निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्षांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
या पक्षांमध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचाही समावेश आहे. इतकंच नाही, तर आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षाचाही या यादीत समावेश आहे.
खालील राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे
खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना
< रामदास आठवले यांचा रिपाई
< कपिल पाटील यांचा लोकभारती
< विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती
< ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस
< भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष
< इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी
< मागासवर्गीय जनशक्ती पार्टी
< राष्ट्रवादी जनता पार्टी
< प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी
< सत्यशोधक समाज पक्ष
< शिवराज्य पक्ष,
< रिपाई(डेमोक्रॅटिक),
< महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस,
< रिपब्लिकन पक्ष (खोरीपा),
< जनशक्ती आघाडी पेण