शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:19 IST

राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

नागपूर : राज्य शासनातर्फे दोन टप्प्यांत ७२ हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के पदे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत राखीव ठेवण्यात येतील. त्यानंतरच ती पदे भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत केली.राजकारण करण्याच्या आपल्याला अनेक जागा आहेत. पण जेथे शेकडो वर्षांपासून राज्यभरातील गोरगरीब शेतकरी विठ्ठलभेटीच्या ओढीने येतात तेथे जाऊन राजकारण करू नये. तसे झाले तर ते त्या वारकऱ्यांविरुद्धचे आंदोलन ठरेल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.मराठा समाजातील युवकांना शासनाने शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतिगृहांची सोय असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.> विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाबाबत शासनाने कायदा केला.

> न्यायालयीन प्रक्रियेत ही बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. त्याच्यावर अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचे निधन झाल्याने न्या. गायकवाड यांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे. सध्या आयोगाच्या अध्यक्षांमार्फत प्रक्रिया सुरू असून त्यांच्या मार्फत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.> या आयोगाच्या अहवालानुसार आरक्षणाबाबत शासन निर्णय घेईल. शासनाच्या वतीने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू.महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखणारमराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास विठ्ठलाच्या पूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखू, असा इशारा नाशकात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. पंढरपुरात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतदेखील असाच इशारा देण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हास्यास्पदमराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखून ठेवण्याचे केलेले वक्तव्य हास्यास्पद व सुप्रीम कोर्टाचा अवमान त्यातून होत आहे. - अ‍ॅड प्रकाश आंबेडकर,भारिप, बहुजन महासंघाचे नेते

धनगर आरक्षणाचा अहवाल तयार : धनगर आरक्षणासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, यासाठी टाटा सामाजिक संस्थेचा सर्व्हे पूर्ण झाला असून, त्यांचा अहवालही तयार झाला आहे. तो लवकरच राज्य शासनाला सादर केला जाणार असून तो अहवाल आला की आपण लगेचच त्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करु.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८marathaमराठा