वाळीत प्रकरणी १६ जणांना कोठडी

By Admin | Updated: March 21, 2015 01:56 IST2015-03-21T01:56:34+5:302015-03-21T01:56:34+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील नानवली गावातील जानू भोपी यांनी आपल्या मुलीला घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता.

16 people were arrested in connection with the case | वाळीत प्रकरणी १६ जणांना कोठडी

वाळीत प्रकरणी १६ जणांना कोठडी

अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील नानवली गावातील जानू भोपी यांनी आपल्या मुलीला घटस्फोट मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. यामुळे संतप्त झालेल्या नानवली कुणबी जातपंचायतीच्या एकूण १६ जणांनी भोपी यांना गेल्या सहा वर्षांपासून वाळीत टाकले होते. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करून शुक्रवारी श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना १२ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
यात जातपंचायतीचे प्रमुख व यशवंत पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत हांडे, चंद्रकांत नाक्ती, काशिराम हांडे, तुकाराम जांभळे, किसोर गोरीवले, महादेव गोरीवले, रमेश गोरीवले, मंगेश नाकती, हरिश्चंद्र गोरीवले, प्रमोद गोरीवले या स्थानिकांसह गावच्या मुंबई मंडळाच्या सदस्यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, या वाळीत प्रकरणात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले व आज न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले, तरी नानवली कुणबी जातपंचायतीने जानू भोपी यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कार मागे घेतलेला नाही.

Web Title: 16 people were arrested in connection with the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.