कुंभमेळ्यासाठी १६ कोटीचे ४५४ सीसीटीव्ही
By Admin | Updated: April 7, 2015 04:33 IST2015-04-07T04:33:39+5:302015-04-07T04:33:39+5:30
दोन महिन्यावर आलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

कुंभमेळ्यासाठी १६ कोटीचे ४५४ सीसीटीव्ही
जमीर काझी, मुंबई
दोन महिन्यावर आलेल्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.नाशिक व त्र्यंबकेश्वरातील १६७ महत्वाची ठिकाणी निश्चित करण्यात आलेली असून या ठिकाणी ४५४ कॅमेरे बसविले जाणार आहेत.
कुंभमेळ्याच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर बसविण्यात येणा-या या विशेष कॅमेऱ्यासाठी १६ कोटी ८ लाखावर निधी खर्च करण्याला गृहविभागाने हिरवा कंदील दिला आहे. आवश्यकतेनुसार याठिकाणी टप्याटप्याने कॅमेऱ्यांची संख्या
आणखी वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कुंभमेळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिने आवश्यक शस्त्रसामग्रीसाठी केंद्र व राज्यसरकारने कोट्यवधीच्या निधीची तरतूद केलेली आहे.त्यानुसार खरेदी व तांत्रिक समितीने मंजुर केलेल्या निविदेला गृह विभागाकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये १५२ ठिकाणी २७४
तर त्रंबकेश्वरमध्ये ५५ ठिकाणी १८० कॅमेरे बसविले जाणार असून
येत्या पंधरवड्यात त्याबाबतची कार्यवाही सुरु केली जाणार आहे.
दर बारा वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून विविध आखाड्यातील हजारो संत-साधूंचे आगमण होणार आहे.
वर्षभर चालणाऱ्या या सोहळ्यात सहभागी भाविकांची संख्या काही लाखांमध्ये असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी विशेष दक्षता बाळगली जात आहे.सुरक्षेच्यादृष्टिने कोणतीही त्रुटी न रहाण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वरिष्ट अधिकाऱ्यांनी त्याबाबत घटनास्थळी भेट नियोजन केले जात आहे.
नाशिकमध्ये १५२ ठिकाणी २७४ कॅमेरे बसविण्यासाठी सुरवातीला शासनाने ७.११ कोटीचा निधी निश्चित केला होता. मात्र निविदा प्रकियेमध्ये त्यासाठी उत्तम दर्जाचे व न्यूनत्तम
दराने अतिरिक्त ४ कोटी ८७ लाख,
३२ हजार४४३ रक्कमेची आवश्यकता होती.त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरमधील ५५ ठिकाणी १८० कॅमेरे आणि कायमस्वरुपी कंट्रोलरुम बांधण्यासाठी ३.३५ कोटीची निधीची तरतूद केली होती.
मात्र त्यासाठी आणखी ७५ लाख, २९ हजार६८० रुपयांची गरज लागणार असल्याचे टेंडरमधून स्पष्ट झाले.त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या
वाढीव निधीसाठी खरेदी समितीने नव्याने प्रस्ताव बनविला होता.
त्याला वित्त विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर गृह विभागाने त्याबाबतचे आदेश बजाविलेले आहेत. त्यानूसार या दोन्ही शहरामध्ये एकुण ४५४ कॅमेरे बसविले जातील. त्यासाठी एकुण १६ कोटी ८ लाख ६२ हजार १२३ खर्च येणार आहे. कुंभमेळा संपल्यानंतर कंपनीला हे कॅमेरे परत केले जाणार आहेत.