१५ आॅक्टोबरला वाचन प्रेरणा दिन
By Admin | Updated: October 13, 2015 03:16 IST2015-10-13T03:16:13+5:302015-10-13T03:16:13+5:30
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन १५ आॅक्टोबर, हा संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

१५ आॅक्टोबरला वाचन प्रेरणा दिन
मुंबई : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन १५ आॅक्टोबर, हा संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्त्ताने शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक कार्यालये या ठिकाणी डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे एकमेकांना पुस्तक भेट देऊन, डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक ग्रंथालये, व्यावसायिक कार्यालये यांच्यासह अनेक साहित्य-सांस्कृतिक संस्थाही या उपक्र मात सहभागी होणार आहेत. तावडे सकाळी विरार पूर्व येथील आचोळे शाळा,वसई पश्चिम येथील वर्तक महाविद्यालय आणि मनोरीमधील ज्ञानसाधना विद्यामंदिर शाळेला भेट देणार आहोत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळांमध्ये डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्ट्याचे उद्घाटन होईल. यावेळी अभिनेते स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, कौशल इनामदार, अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, लेखक मिलिंद कांबळे, अभिराम भडकमकर अशा नामांकित व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. विकिपीडिया मराठी या उपक्र मात अधिक उत्साहाने सहभागी होतील. (विशेष प्रतिनिधी)