शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘त्या’ १५४ पीएसआयना दिवाळीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:48 IST

अधिकारी पदाच्या खडतर प्रशिक्षणाची पूर्तता आणि वर्दीवर बॅच लावल्यानंतर अपमानास्परीत्या पदावनत केलेल्या १५४ मागासवर्गीय प्रवर्गातील उपनिरीक्षकांची दिवाळी अखेर खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.

- जमीर काझीमुंबई  - अधिकारी पदाच्या खडतर प्रशिक्षणाची पूर्तता आणि वर्दीवर बॅच लावल्यानंतर अपमानास्परीत्या पदावनत केलेल्या १५४ मागासवर्गीय प्रवर्गातील उपनिरीक्षकांची दिवाळी अखेर खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून द्विधा मनस्थितीत वावरणा-या या अधिकाºयांना पदावनत करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) मंगळवारी रद्द केले. प्रशासकीय गोंधळामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती निर्माण झाल्याची फटकार गृह विभागाला लगावली.‘मॅट’चे अध्यक्ष ए. एच. जोशी यांनी हा निकाल दिला. त्यामुळे नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या मागासवर्गीय उमेदवारांना आता पर्यवेक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्याचा गृहविभागाचा अडसर दूर झाला आहे. ‘लोकमत’ने १५४ उमेदवारांवर होणाºया अन्यायाचा विषय सातत्याने लावून धरला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांना ही पदोन्नती नसून, सरळसेवा परीक्षेतून निवड झाल्याचे जाहीर करावे लागले होते. त्याबाबतचे शपथपत्र गृहविभागाने दाखल केल्यानंतर प्राधिकरणाने निर्णय जाहीर केला. त्याचप्रमाणे, या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.उपनिरीक्षकाच्या ११५व्या बॅचचे पाच आॅक्टोबरला दीक्षांत संचलन झाले होते. मात्र, त्यात सहभागी असलेल्या १५४ मागासवर्गीय उमेदवार यांना आरक्षणातून पदोन्नती दिल्याचा आक्षेप खुल्या प्रवर्गातील काही उमेदवारांनी घेतला होता. त्याबाबत गृहेविभागाने योग्य प्रकारे भूमिका न मांडल्याने, ‘मॅट’ने चार आॅक्टोबरला त्यांची नियुक्ती रद्द केली. त्यामुळे दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या प्रक्षिणार्थींना नियुक्ती न देता मूळ पदावर व घटकात पाठविण्यात आले. त्याला आव्हान दिल्यानंतर गेल्या महिन्याभरात उलटसुलट भूमिका मांडली जात होती. अखेर गृहविभागाने संबंधिताची निवड ही परीक्षेतून झाल्याचे शपथपत्र दिल्याने ‘मॅट’चे अध्यक्ष जोशी यांनी ४ आॅक्टोबरचा निर्णय मागे घेतला. या प्रकरणी याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, अ‍ॅड.जयश्री पाटील व डी. बी. खैरे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली.गृहविभागाला खबरदारी घेण्याची सूचनाराखीव प्रवर्गातील १५४ अधिकाºयांना मूळ पदावर परत पाठविण्याच्या निर्णयामुळे राज्य सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, अशी भावना संबंधितामध्ये होत असून, त्यामुळे खात्यामध्ये जातीय गटबाजी निर्माण होण्याचा धोका आहे, असा इशारा राज्य गुप्तवार्ता विभागाने दिला होता. त्या विरोधात सोशल मीडियावरून विविध मेसेज, व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याने, योग्य खबरदारी घेण्याची सूचना गृहविभाग व पोलीस महासंचालकांना दिलेल्या अहवालात केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र