शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती विभागातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 02:18 IST

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती.

नागपूर : शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला. विविध तणावांमुळे लॉकडाऊनच्या दोन महिन्यातच अमरावती विभागातील १५१ शेतकºयांनी आत्महत्या केली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यातच अमरावती विभागात १५१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यातील १९ प्रकरणे नियमानुसार मदतीसाठी पात्र ठरली तर ३६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ ११ प्रकरणांतच आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली. दरम्यान, जानेवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागातील ३८७ शेतकºयांनी आत्महत्या केली.यवतमाळमध्ये सर्वाधिक संख्यालॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त ५४ शेतकरी आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. तर अमरावतीमध्ये ही संख्या ४० इतकी होती. अकोल्यामध्ये सर्वात कमी १३ आत्महत्या नोंदविण्यात आल्या.४१ महिन्यांत साडेतीनहजारांहून अधिक आत्महत्यादरम्यान, २०१७ ते मे २०२० या कालावधीत विभागात एकूण ३ हजार ५५८ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील १ हजार ७५० म्हणजेच ४९.१८ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. तर प्रत्यक्षात त्यातील १ हजार ६५७ शेतकºयांच्या कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्यात आली.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या