शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९० हजार कर्मचाऱ्यांचे १,५०० कोटी एसटीने थकविले; पीएफ, उपदानाची रक्कम ट्रस्ट अडचणीत येण्याचा धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 06:06 IST

विलास गावंडे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी (पीएम) आणि उपदानाची रक्कम ...

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी (पीएम) आणि उपदानाची रक्कम वर्षभरापासून एसटीने ट्रस्टकडे जमा केलेली नाही. ९० हजार कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम १५०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. परिणामी ट्रस्ट अडचणीत येऊन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी व उपदानबाबत (ग्रॅच्युइटी) व्यवहार पाहण्यासाठी एसटीचा एक स्वतंत्र ट्रस्ट आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांची तर, अर्धी महामंडळाची जमा होते. या रकमा ट्रस्टकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत. जेवढी अधिक रक्कम जमा होईल, तेवढे ट्रस्टला अधिक व्याज मिळेल. याचा लाभ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. मात्र, महामंडळाने ही रक्कम थकविली आहे.

ट्रस्ट अडचणीतसरकारकडून प्रत्येक महिन्याला उशिरा मिळणाऱ्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जात आहे; परंतु त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाची रक्कम ट्रस्टकडे जमा केली जात नसल्याने ट्रस्ट अडचणीत येऊ शकते.

सरकारचा चार वर्षे मदतीचा शब्द; पण...• कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्षे देण्याचे त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते; परंतु हाnसरकारने सवलत मूल्य रक्कम तोडून तोडून न देता अॅडव्हान्स म्हणून द्यावी. वर्षभराची साधारण ४४०० कोटी रुपये इतकी रक्कम आगाऊ दिल्यास अनेक आर्थिक प्रश्न निकाली निघतील.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसशब्द पाळला गेला नाही. सध्या केवळ सवलत मूल्य• प्रतिपूर्ती रक्कम तोडून-तोडून देण्यात येत आहे. या रकमेवरील मिळणारे व्याज बुडत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :state transportएसटी