शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

परळीतील १५ गावांचा कायापालट !

By admin | Updated: April 7, 2017 05:28 IST

युपीएल कंपनीच्या सहकार्याने स्वयंसेवी संघटनेमार्फत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाला आता फळे दिसू लागली आहेत.

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात बळीराजाच्या मदतीसाठी युपीएल कंपनीच्या सहकार्याने स्वयंसेवी संघटनेमार्फत राबविल्या जात असलेल्या उपक्रमाला आता फळे दिसू लागली आहेत. येथील महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्या असून सकस आहारामुळे बालकांच्या कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे.‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चळवळीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मयंक गांधी यांनी समाजहितैषी डॉ. वंगे यांंना सोबत घेऊन परळी तालुक्यातील १५ गावे दत्तक घेतली. तेथील ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याच्या हेतूने युनायटेड फॉस्फरस कंपनीने (युपीएल) मे २०१६ मध्ये या उपक्रमाला पाठबळ दिले.पहिल्या टप्प्यात अत्यंत धाडसी पाऊल टाकत दत्तक गावांतील दारू विक्रीचे धंदे बंद करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना शेळी आणि कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या सहाकार्याने परळीतून वाहणाऱ्या चार मोसमी नद्यांचे खोलीकरण करण्याचा उप्रकम हाती घेण्यात आला. तसेच पावसाळ्यातील कूपनलिका पुनर्भरणासाठी रोधी बंधारे (चेक डॅम्स) बांधण्यात आले. जैन इरिगेशनच्या माध्यमातून ठिबक सिंचनातून शेती पिकविण्याचा पर्याय दिला. काही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने ठिबकचा पर्याय स्वीकारला. हगणदारीमुक्त मोहीमही कमालीची यशस्वी ठरली. सध्या ४० टक्के कुटुंबियांकडे स्वत:ची शौचालये आहेत. हे उद्दिष्ट १०० टक्क्यांवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.याशिवाय गावांतील शाळा नव्याने बांधून रंगोरंगोटी करण्यात आली. शाळांमधून विद्यार्थी योगाचे धडे गिरवितात. मेज आणि खुर्ची उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एलसीडी स्क्रीन बसवून ई-लर्निंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. काही शाळांना संगणकही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसीत व्हावे, यासाठी फुटबॉल शिबिरांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, पुणे फुटबॉल क्लबचे खेळाडू त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी परळीला नियमित भेट देतात. त्यामुळेच मॅरेथॉनमधील परळीतील तरुणाईचा सहभाग प्रशंसनीय होता. पाणी बचाव आणि जलपुनर्भरण मोहिमेतही पावसाच्या पाण्याचे संर्वधन करण्याची यंत्रणाही शाळांच्या आवारात बसविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी परळीत खरेदी केंद्र स्थापन करण्यासाठीही युपीएलने पुढाकार घेतला आहे. या सर्वांमधून शेतकरी कुटुंबांचे एकुणच राहणीमान सुधारल्याने या परिसराचा कायापालट झालेला दिसून येत आहे. परिवर्तनाचा हा यज्ञ असाच सुरू ठेवण्याचा मानस युपीएलच्या व्हाईस चेअरमन सॅन्ड्रा श्रॉफ यांनी बोलून दाखविला. (विशेष प्रतिनिधी)>महिला सक्षमीकरणावर भरमहिलांच्या स्वयंसहायता बचत गटांना पाठबळ देण्यावर ‘यूपीएल’ने लक्ष केंद्रित केले आहे. परळीतील महिला गट पर्यावरणभिमुख पिशव्या तयार करतात. ही साधी पिशवी म्हणजे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याचे द्योतक होय. सोयादूध, सोयादहीमुळे आहार पोषक होऊन कुपोषणाची समस्येवर मात करण्यात यश आले आहे. - सॅन्ड्रा श्रॉफ, व्हाईस चेअरमन, युपीएल >मुलांना रोजच्या आहारासोबत पोषक आहार देण्यासाठी त्यांच्या पालकांना सोयादूध, सोयादही तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.