कुंभमेळ्यासाठी १५ हजारांची कुमक
By Admin | Updated: April 8, 2015 23:34 IST2015-04-08T23:34:00+5:302015-04-08T23:34:00+5:30
नाशिकमध्ये यंदा भरत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्यातील १५ हजार पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवण्यात

कुंभमेळ्यासाठी १५ हजारांची कुमक
मुंबई : नाशिकमध्ये यंदा भरत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्यातील १५ हजार पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांच्या २७३ मंजूर पदांपैकी २४८ पदे भरण्यात आली आहेत. पोलीस कर्मचा-यांच्या ३ हजार ०३६ मंजूर पदापैकी २ हजार ९४१ पदे भरण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सीसीटीव्ही टेंडर काढलेले आहे. यातील अनियमीततेबाबत सध्या चौकशी चालू आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. असे सागून सीसीटीव्हीचे काम कुंभमेळ्याव्यापूर्वी होईल, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कुंभमेळाव्याच्या नियोजनासाठी राज्यातील सर्व पोलीस फोर्स नािशकमध्ये आणला जाणार आहे.