३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ जणांची बदली
By Admin | Updated: November 29, 2015 02:42 IST2015-11-29T02:42:55+5:302015-11-29T02:42:55+5:30
गुन्हे शाखेच्या ३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी पोलीस

३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ जणांची बदली
मुंबई : गुन्हे शाखेच्या ३ वरिष्ठ निरीक्षकांसह १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी पोलीस आयुक्त अहमद जावेद काहींच्या कामाबाबत असमाधानी असल्याने त्यांना हलविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गुन्हे शाखेतील माधव मोरे यांची नवघर पोलीस ठाणे, लिंबण्णा व्हनमाने यांची कुरार आणि श्रीधर हंचाटे यांची विक्रोळी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.
संरक्षण व सुरक्षा शाखेमध्ये असलेल्या ज्ञानेश्वर जवळकर यांची अंधेरी पोलीस ठाण्यात, अरुण माने यांची वर्सोवा पोलीस ठाण्यात बदली केली आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग शिंदे यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तर शिंदे यांच्या जागी वाहतूक / संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सुरुलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश देसाई यांना विशेष शाखा १मध्ये धाडण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सशस्त्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक
लक्ष्मण शिंदे (मालवणी),
विशेष शाखेतील शोभा पिसे (मालाड) व ठाण्यातून आलेल्या सुरेश कदम यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.