शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १५ लाख कामगार देशव्यापी संपात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:59 IST

८, ९ जानेवारीला सार्वत्रिक संप : राज्यव्यापी परिषदेत घेतला निर्णय

मुंबई : राष्ट्रीय कामगार संघटना कृती समितीने ८ व ९ जानेवारीला पुकारलेल्या संपाला राज्यातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समिती ने पाठिंबा जाहीर केला आहे. संप यशस्वी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचे नियोजन करण्याचा निर्धार शुक्रवारी सायंकाळी झालेल्या राज्यव्यापी परिषदेत करण्यात आला. परळ-भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात ही परिषद पार पडली.या परिषदेसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या कामगार संघटनांचे सुमारे ४०० कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी ठराव मांडला. ठराव मांडताना कराड म्हणाले की, सरकार कामगार विरोधी धोरणे राबवत असून कामगारांना नेस्तनाबूत करण्याचा त्यांचा मानस आहे. या सरकारच्या कार्यकाळात २०१५पासून एकही राष्ट्रीय श्रम परिषद घेण्यात आलेली नाही. सरकारचे कापोर्रेट कंपन्यांना फायदा करून देण्याचे धोरण राबवण्याची नीती चालू आहे. इंटकचे गोविंदराव मोहिते यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला राज्यातील १५ लाख कामगारांनी मतपेटीच्या माध्यमातून जागा दाखविण्याचे आवाहन केले. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने यात सामील होण्याचा सल्ला त्यांनी दिला.बँक व विमा क्षेत्र सरकारने मोडकळीस आणले आहे व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था बिकट होत असून होणारी तूट भरून काढण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार जुमलेबाजीचे राजकारण करत असून नको त्या कारणांसाठी रिझर्व बँकेच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. - विश्वास उटगी, सहनिमंत्रक-कामगार संघटना संयुक्त कृती समिती.देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या प्रमुख मागण्या -महागाईवर नियंत्रण आणणारी प्रभावी पावले उचला.रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना करून बेरोजगारीवर नियंत्रण आणा.ग्रामीण व शहरी भागात मागेल त्याला किमान वेतन मिळणाºया कामाची हमी द्या व त्याची अंमलबजावणी करा.सर्व ठिकाणी कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करा.

टॅग्स :StrikeसंपMaharashtraमहाराष्ट्र