गोंधळी विमान प्रवाशांना होणार १५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 05:33 IST2017-04-18T05:33:25+5:302017-04-18T05:33:25+5:30
विमानात गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तणूक करणाऱ्या प्रवाशांना १५ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा एअर इंडिया विचार करीत आहे.

गोंधळी विमान प्रवाशांना होणार १५ लाखांचा दंड
नवी दिल्ली : विमानात गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तणूक करणाऱ्या प्रवाशांना १५ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा एअर इंडिया विचार करीत आहे. खा. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, गैरवर्तन या पार्श्वभूमीवर एअर इंडिया हा विचार करीत आहे. खा. गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह सर्व विमान कंपन्यांनी काही काळ प्रवासबंदीच जाहीर केली होती. वहाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्या सूचनेनंतर ती मागे घेण्यात आली, पण भविष्यात असे प्रकार घडू नयेत, म्हणून एअर इंडिया दंडात्मक कारवाईचा विचार करीत असून, नंतर अन्य विमान कंपन्यांची तसेच करण्याची शक्यता आहे.