ट्रक- बस अपघातात १५ जखमी
By Admin | Updated: June 16, 2017 15:59 IST2017-06-16T15:59:24+5:302017-06-16T15:59:24+5:30
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईपासून चार किमी अंतरावर गढीनजीक आज सकाळी साडेअकरा वाजता ट्रक व बसची समोरासमोर धडक

ट्रक- बस अपघातात १५ जखमी
> ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 16 - धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईपासून चार किमी अंतरावर गढीनजीक आज सकाळी साडेअकरा वाजता ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले.
बीड, दि. 16 - धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईपासून चार किमी अंतरावर गढीनजीक आज सकाळी साडेअकरा वाजता ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले.
जालना येथून अंबाजोगाईकडे जाणाºया बस (क्र. एमएच १४ बीटी- १३७६) ला सोलापूरहून औरंगाबादकडे जाणाºया ट्रक (क्र. आर. जे. ०२ जीए- ५८५१) ने जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेनंतर बसचा चालकाच्या बाजूचा संपूर्ण पत्रा कापत गेला. त्यामुळे बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेसह खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी गेवराई ठाण्याचे पोलीस, महामार्ग पोलीस व एसटी महामंडळाचे अधिकारी पोहोचले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरु आहे.
हे आहेत जखमी...
सखाराम चाळक (रा. किनगाव ता. गेवराई), बाळासाहेब हातोडे (रा. रेवकी ता. गेवराई), शिवदास चव्हाण, जनाबाई चव्हाण, दामू चव्हाण (तिघे रा. सुशी ता. गेवराई), मीरा राख (रा. पांगरी ता. बीड). विजूबाई काळापारे, महेश काळापाटे (दोघे रा. लुखामसला ता. गेवराई), मच्छिंद्र लेंडाळ (रा. रोहितळ ता. गेवराई), ज्योती जाधव, तात्या जाधव (रा. नेवले ता. लातूर), फरजाना कुरेशी, सलमा इब्राहिम (दोघी रा. सुकफुली ता. अंबड), गायत्री ढोकले (रा. राजपिंप्री ता. गेवराई) व स्वाती माळी (गाव माहीत नाही) यांचा १५ जणांचा जखमींत समावे आहे. त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.