शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम, सरकार टिकावे म्हणून कोर्टात प्रयत्न करता, तसे आरक्षणासाठी करा - विनोद पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 07:18 IST

Maratha Reservation: सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात  जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले.

औरंगाबाद : सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात  जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले. मराठा आरक्षणसंदर्भात १५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा निर्णायक आंदोलनाला सरकारला सामोरे जावे  लागेल, असा थेट इशारा दिला. 

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक व कार्यकर्त्यांची  गुरुवारी बैठक झाली. तीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना  विनोद पाटील म्हणाले की,  आम्ही सरकारला दोन पर्याय देत आहोत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे मराठा आरक्षणाविषयी नव्याने प्रक्रिया सुरू करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार का? दुसरा पर्याय सरकार सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात रिव्ह्यू पिटीशन करणार आहे का? यापैकी एक भूमिका सरकारला जाहीर करावी लागेल. यापूर्वी समाजाने रस्त्यावरील लढा दिला व न्यायालयात कायदेशीर लढा दिला आहे. पुढचा लढा यापेक्षा वेगळाच असेल, असे सांगून त्यावर सविस्तर बोलणे त्यांनी टाळले.

मराठा मोर्चे निघाले तेव्हा ते लीडरलेस होते, असे सांगून विनोद पाटील म्हणाले की, यापुढेही आमच्या लढ्याला कोणताही चेहरा नसेल.  अग्रभागी समाजातील  महिला व  ज्येष्ठ नागरिक असतील. अशा नागरिकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यास जाणार आहे. ते आमची अस्मिता संभाजीराजे यांचे नेतृत्व आपण मानता का, असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, ते राजगादीचे वारस आहेत व आमची अस्मिता असून प्रेरणादायी आहेत. ते नेतृत्वाच्याही वर आहेत, असे सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे नेतृत्व मानण्यास नकार दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र