शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार कोटींचा निधी पळविला, अनुसूचित जातींच्या कल्याणाकडे दुर्लक्ष

By यदू जोशी | Updated: December 20, 2020 06:51 IST

Scheduled Castes : सरकार आघाडीचे असो की भाजपचे अनेक वर्षांपासूनच्या आकडेवारीचा त्यास भक्कम आधार असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेली आकडेवारी ही सोनिया गांधींनी मांडलेल्या व्यथेला दुजोरा देणारी आहे.

- यदु जोशी

मुंबई : अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय निधीचा पुरेपूर वापर होत नाही, ही खंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.सरकार आघाडीचे असो की भाजपचे अनेक वर्षांपासूनच्या आकडेवारीचा त्यास भक्कम आधार असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेली आकडेवारी ही सोनिया गांधींनी मांडलेल्या व्यथेला दुजोरा देणारी आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतानाही सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर अन्य विभागांनी डल्ला मारला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूद या विभागासाठी करण्यात आली होती. त्यातील २२ हजार २६८ कोटी रुपये खर्च झाले आणि १४ हजार १९८ कोटी रुपये अखर्चित राहून अन्य विभागांना दिले गेले. त्याआधीच्या आघाडी सरकारच्या काळातही पळविलेल्या निधीची आकडेवारी अशीच मोठी होती.यंदा या विभागाच्या निधीवर कोरोनामुळे वेगळेच संकट आले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात या विभागासाठी ९,३०० कोेटी रुपयांची तरतूद करण्यात आली.मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वच विभागांनी तरतुदीच्या केवळ ३३ टक्केच निधी खर्च करावा, असे बंधन वित्त विभागाने टाकले. त्याचा मोठा फटका सामाजिक न्याय विभागाला बसला. ९,३०० कोटी रुपयांपैकी केवळ ३ हजार कोटी रुपये आतापर्यंत विभागाला मिळाले. परवा विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये आणखी २,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. याचा अर्थ ९,३०० कोटी रुपयांपैकी चालू आर्थिक वर्षात ५ हजार ४०० कोटी रुपयेच विभागाला मिळणार आहेत. याचा अर्थ ४,१०० कोटी रुपयांचा कट लागेल. २०१९-२० च्या वार्षिक अर्थसंकल्पात फडणवीस सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. प्रत्येक विभागाच्या तरतुदीला ३० टक्के कट लावण्यात आला. त्यामुळे नव्या सरकारनेही विभागाच्या तरतुदीस जवळपास ३ हजार कोटी रुपयांचा कट लावला होता.

सोनिया गांधींच्या पत्रातील व्यथेला दुजोरा-  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातील व्यथेला आकडेवारीमुळे दुजाेरा मिळाला. -  गेली २० वर्षे अनुसूचित जातींच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी गेली दोन-अडीच दशके अखर्चित ठेवून अन्य खात्यांकडे वळविण्यात आला. - त्यावर अनेक संघटनांनी अनेकदा ओरड केली, वृत्तपत्रांनीही लिहिले; पण, निधीची पळवापळवी कायम राहिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधी