शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Maharashtra Unlock: १४ जिल्हे अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी, रेस्टॉरंट, बार, सिनेमागृह, जिम पूर्ण क्षमतेने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 05:19 IST

कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना आटोक्यात आल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. नवीन नियमावली ४ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून अंमलात येणार आहे. संबंधित १४ जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचादेखील समावेश आहे.

या जिल्ह्यांमधील शाळा, काॅलेज, ऑफलाइन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील.  निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या १४ जिल्ह्यांची निश्चिती करताना पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा जास्त, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असणे हे निकष लावण्यात आले आहेत. या जिल्ह्यांना ‘अ’ श्रेणीत ठेवले आहे. अन्य जिल्हे ‘ब’ श्रेणीत आहेत.  

- सार्वजनिक क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व आस्थापनांच्या स्टाफला लसीकरण आवश्यक.

- सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणाऱ्या सर्वांसाठी पूर्ण लसीकरण आवश्यक.

- मॉल, थिएटर, नाट्यगृह, पर्यटनस्थळ, उपाहारगृह, क्रीडा सामने, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी भेटी देणाऱ्या अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण आवश्यक.

- कारखान्यांमधील कामगारांचे पूर्ण लसीकरण अनिवार्य असेल.

१०० टक्के क्षमतेने ‘हे’ सुरू 

शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्वीमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क

- खासगी आणि सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी.

- सार्वजनिक ठिकाणी १००% क्षमतेने कामकाजाची मुभा, इतर जिल्ह्यांमध्ये हे ५० टक्क्यांपर्यंत असेल.

- १४ जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांत संबंधित सेवांना ५० टक्के क्षमतेची मर्यादा असेल.

- सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

- ५० टक्के उपस्थितीची मर्यादा: सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम सभागृहे किंवा मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे.

- २२ दिवसांपासून नवे रुग्ण एक लाखाच्या आत राहिलेले आहेत. गेल्या २४ तासांत ८,८७१ रुग्ण बरे झाले. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लसीच्या १७७.५० कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

- हो, अर्थातच मास्कची सक्ती कायम: राज्यभरात मास्क वापराची सक्ती कायम असेल. मध्यंतरी अशी सक्ती मागे घेणार असल्याची चर्चा होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार