पावसामुळे मध्य रेल्वेचे १४ कोटी पाण्यात
By Admin | Updated: June 23, 2015 02:30 IST2015-06-23T02:30:18+5:302015-06-23T02:30:18+5:30
शुक्रवारसह शनिवारी पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्या दोन्ही दिवसांमध्ये उपनगरीय वाहतुकीसह लांब

पावसामुळे मध्य रेल्वेचे १४ कोटी पाण्यात
अनिकेत घमंडी, डोंबिवली
शुक्रवारसह शनिवारी पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्या दोन्ही दिवसांमध्ये उपनगरीय वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्यांची वाहतूक प्रभावित झाल्याने रेल्वेला १४ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती वाणिज्य विभागाच्या वरिष्ठांनी ‘लोकमत’ला दिली. विशेषत: गुड्स (मालगाड्यांच्या) वाहतुकीचा फटका अधिक असल्याचेही सांगण्यात आले. उपनगरीय लोकलच्या १६१० फेऱ्या, १८० मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या २५०हून अधिक फेऱ्या अप/डाऊनवर प्रतिदिन होत असतात. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत असते. या दोन दिवसांच्या गोंधळात बहुतांशी लांब पल्ल्यासह मालगाड्या आणि उपनगरीय गाड्या रद्द कराव्या लागल्या, अनेक गाड्यांचे रुट ऐनवेळी बदलावे लागले आदींसह अन्य विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे न धावल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.