वाळीत प्रकरणी 14 जणांवर गुन्हा
By Admin | Updated: December 11, 2014 02:05 IST2014-12-11T02:05:19+5:302014-12-11T02:05:19+5:30
ग्रामदैवताचे दर्शन घेण्यास मनाई करीत गावकी सांगेल तसे न वागल्यामुळे एका कुटुंबाला दहा हजार रुपयांची दंड ठोठावून वाळीत टाकल्याची घटना महाड तालुक्यातील आदिस्ते खैरांडे वाडीत घडली.

वाळीत प्रकरणी 14 जणांवर गुन्हा
महाड : ग्रामदैवताचे दर्शन घेण्यास मनाई करीत गावकी सांगेल तसे न वागल्यामुळे एका कुटुंबाला दहा हजार रुपयांची दंड ठोठावून वाळीत टाकल्याची घटना महाड तालुक्यातील आदिस्ते खैरांडे वाडीत घडली. याप्रकरणी गावातील 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गावच्या तंटा मुक्ती समितीच्या उपाध्यक्षांचाही समावेश आहे. आज जागतिक मानवी हक्क दिनीच दाखल झालले हे महाड तालुक्यातील 15 दिवसांतील दुसरे वाळीत प्रकरण आहे.
याप्रकरणी संजय देहू टक्के यांनी थेट न्यायालयात तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिस्ते खैरांडेवाडी येथील संजय टक्के हे सध्या महाड शहरानजीक चोचिंदेत राहतात. सणासुदीच्या काळात हे कुटुंब आदिस्ते येथे जाते. त्यांना गावकीची सक्ती मान्य नाही. नवरात्रोत्सवात संजय टक्के हे सहकुटुंब गावात देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गावक:यांनी टक्के यांना देवदर्शनास मनाई केली व कुटुंबाला गावाबाहेर ठेवण्यास सांगितले. गावकीच्या विरोधात गेल्यामुळे त्यांना दहा हजार रुपये दंड ठोठावला. त्यांच्याशी संबंध ठेवणा:यांनाही दंड ठोठावला. त्यामुळे टक्के यांनी न्यायालयात धाव घेतली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)