भटकळविरोधात आरोपपत्र दाखल १३/७ बॉम्बस्फोट प्रकरण
By Admin | Updated: June 17, 2014 03:38 IST2014-06-17T03:38:35+5:302014-06-17T03:38:35+5:30
दादर, झवेरी बाजार व आॅपेरा हाउस येथे बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी अतिरेकी यासिन भटकळ व अस्सउल्ला अख्तरविरोधात पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले़

भटकळविरोधात आरोपपत्र दाखल १३/७ बॉम्बस्फोट प्रकरण
मुंबई : दादर, झवेरी बाजार व आॅपेरा हाउस येथे बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी अतिरेकी यासिन भटकळ व अस्सउल्ला अख्तरविरोधात पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले़ हे आरोपपत्र ५४३ पानी असून, त्यात ५९ साक्षीदारांचा समावेश आहे़ तसेच या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या मोटारसायकलच्या चाव्या व इतर वस्तूंचा समावेश आहे़ मकोका कायद्याच्या कलमांतर्गत हे आरोपपत्र दाखल केले आहे़ हा बॉम्बस्फोट १३ जुलै २०११ रोजी
झाला होता़ यात २७ जणांचा बळी गेला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले़ या प्रकरणी पोलिसांनी नख्वी अहमद, नदीम शेख व इतर आरोपींना अटक केली़ त्यांच्याविरोधात २०१२मध्ये आरोपपत्रही दाखल केले़ (प्रतिनिधी)