शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

राज्यात १३३६ आरोग्य उपकेंद्रांना मिळणार आयुर्वेद डॉक्टर, ग्रामीण जनतेची होणार सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 7:10 AM

राज्यभरात परिचारिकांच्या भरवशावरच चालणारे आरोग्य उपकेंद्र आता कात टाकणार आहे. राज्यातील तब्बल १३३६ उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होणार आहे.

हिंगोली : राज्यभरात परिचारिकांच्या भरवशावरच चालणारे आरोग्य उपकेंद्र आता कात टाकणार आहे. राज्यातील तब्बल १३३६ उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता डॉक्टरचा उपचार मिळणार आहे.आरोग्यवर्धिनी केंद्र उपक्रमांतर्गत बीएएमएस अर्हताधारक डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर नेमले जातील. हिंगोली, वाशिम, गडचिरोली आदी मागास जिल्ह्यांतील सर्वच उपकेंद्रांना हे डॉक्टर देण्यात येतील. सध्या ३0 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. काही ठिकाणी तीस ते चाळीस गावांचा भार या केंद्रावर आहे. तेथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे या डॉक्टरांना उपकेंद्रांचे दौरे करणे शक्य होत नाही. उपकेंद्रांच्या ठिकाणी तर डॉक्टरच नाहीत. केवळ परिचारिकेच्या भरवशावर तिथला कारभार चालतो. अशावेळी उपकेंद्रातही चांगले उपचार मिळण्यासाठी आयुर्वेद डॉक्टर नेमण्याची ही योजना आहे. जुलै २0१८ अखेर आयुर्वेद डॉक्टरांची ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये समांतर आरक्षणाचे निकषही पाळावयाचे आहेत. शिवाय सुरुवातीचे सहा महिने प्रशिक्षण होणार असून त्यानंतर ११ महिन्याची कंत्राटी नियुक्ती दिली जाणार आहे.१७ जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प१७ जिल्ह्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी १३३६ डॉक्टरांची गरज आहे. यामध्ये गडचिरोलीत २३८, उस्मानाबाद-७८, नंदूरबार १७७, वाशिम १0८, वर्धा-४१, भंडारा-२५, सातारा-४७, चंद्रपूर-५0, सिंधूदुर्ग-८0, नांदेड-६0, जळगाव-२६, लातूर-३३, हिंगोली-१३१, अहमदनगर-३५, पालघर-१३५, गोंदिया-४७ व पुणे जिल्ह्यात २५ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने घेतले जाणार आहेत. अनेक जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे.जनतेला चांगली सेवा मिळेलआरोग्य संवर्धिनी योजनेत कंत्राटी डॉक्टर नेमल्यामुळे उपकेंद्रांतही रुग्णांना चांगले उपचार मिळतील. शिवाय आहार-विहाराचे नियमित मार्गदर्शन मिळेल. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर येणारा ताणही यामुळे कमी होईल.- डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली

टॅग्स :docterडॉक्टरnewsबातम्या