13 वर्षीय मुलीवर बापाचा अत्याचार

By Admin | Updated: April 30, 2016 13:26 IST2016-04-30T13:26:45+5:302016-04-30T13:26:45+5:30

नराधम बापाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ त्यानंतर ही घटना उघडकीस आली़

The 13-year-old girl's father tortured | 13 वर्षीय मुलीवर बापाचा अत्याचार

13 वर्षीय मुलीवर बापाचा अत्याचार

>पारनेर, दि. 30 : 13 वर्षीय मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना मंगळवारी राळेगणसिद्धी येथे घडली असून, शुक्रवारी या नराधम बापाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़, त्यानंतर ही घटना उघडकीस आली़.
या आरोपीची पत्नी नांदत नसून ती माहेरी राहते. दोन्ही मुलीही आईकडेच होत्या, परंतु त्यातील एका तेरा वर्षीय मुलीला या बापाने आपल्याकडे आणले होते. ही मुलगी जनावरे चारण्यासाठी डोंगरावर घेऊन गेली असता या नराधम बापाने तिला तेथेच गाठून अत्याचार केला. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने थेट आजोळ गाठून आई व मामाला हा प्रकार सांगितला. त्यांनी पारनेर पोलिसात फिर्याद दिली.  पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात येत होती. या नराधमाला पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर या घटनेची वाच्यता झाली.
 

Web Title: The 13-year-old girl's father tortured