१३ मजले तोडण्याचे आदेश

By Admin | Updated: December 17, 2014 03:09 IST2014-12-17T03:09:34+5:302014-12-17T03:09:34+5:30

बोरिवली पश्चिम लोकमान्य टिळक रोडवर असलेल्या आदित्य टॉवर या १८ मजली इमारतीचे १३ मजले अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिंडोशी नगर दिवाणी न्यायालयाने हे मजले तोडण्याचे आदेश

13 pieces to break | १३ मजले तोडण्याचे आदेश

१३ मजले तोडण्याचे आदेश

जयाज्योती पेडणेकर, मुंबई
बोरिवली पश्चिम लोकमान्य टिळक रोडवर असलेल्या आदित्य टॉवर या १८ मजली इमारतीचे १३ मजले अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दिंडोशी नगर दिवाणी न्यायालयाने हे मजले तोडण्याचे आदेश दिले आहेत़ याने अजून एका कॅम्पा कोलाची पुर्नरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे़
२००० सालच्या आसपास मेसर्स के पटेल अ‍ॅण्ड कंपनीच्या बिल्डरने हा टॉवर बांधला़ मात्र हा टॉवर बेकायदा असल्याचा आरोप करत येथीलच नंदाधाम इमारतीतील रहिवाश्यांनी न्यायालयात धाव घेतली़ त्यानुसार, हा टॉवर बांधताना नंदाधाम इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग या बिल्डरने केला. तसेच बिल्डरकडे एफएसआय कनव्हेन्स मागितले असता तो देण्यास बिल्डरने नकार दिला.
नंदाधाम रहिवाश्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने आदित्य टॉवर बांधताना एफएसआय व टीडीआरचया दुरूपयोग झाल्याचा निष्कर्ष नोंदवत अवैध मजले तोडण्याचे आदेश दिले़ त्यानुसार अतिरिक्त टीडीआर व एफएसआयची मोजणी केली तर या टॉवरचे तेरा मजले अनधिकृत होत असल्याचे अ‍ॅड़ जितेंद्र धमानी यांनी लोकमतला सांगितले़

Web Title: 13 pieces to break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.