नाशिकमध्ये कांदा 13 रूपये किलो!

By Admin | Updated: June 21, 2014 00:29 IST2014-06-21T00:29:00+5:302014-06-21T00:29:00+5:30

घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याला किलोमागे सरासरी 13 रूपये असा भाव मिळाला.

13 kg of onion in Nashik! | नाशिकमध्ये कांदा 13 रूपये किलो!

नाशिकमध्ये कांदा 13 रूपये किलो!

>नाशिक : घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याला किलोमागे सरासरी 13 रूपये असा भाव मिळाला.  
गेल्या दोन दिवसांपासून कांद्याला सरासरी 13क्क् ते 14क्क् रूपये प्रतिकक्विंटल भाव मिळत आहे. दरात किरकोळ वाढ झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी क्विंटलमागे सरासरी भाव 1,3क्क् रूपये होते. लासलगावमध्ये मागील सप्ताहात 96,925 क्विंटल कांद्याचा लिलाव 35क् ते 1,616 रूपये दराने झाला.
पिंपळगाव बाजार समितीत शुक्रवारी क्विंटलमागे 625 ते 2,क्क्1 रूपये एवढा भाव होता.  18 जूनला कांद्याला क्विंटलला 7क्1 ते 1,861 रूपये एवढा भाव मिळाला. सरासरी भाव 1,351 रूपये इतका होता. कांद्याला 19 जूनला 651 ते 2,क्क्4 भाव मिळाला. सरासरी भाव 1,4क्1 रूपये इतका होता. (प्रतिनिधी)

Web Title: 13 kg of onion in Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.