- संतोष येलकर, अकोलामहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आॅनलाइन विविध १३ प्रकारचे दाखले वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पंचायतराज संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांपैकी नागरिकांना सातत्याने आवश्यक असणाऱ्या १३ सेवांचा समावेश महाराष्ट्र नागरी लोकसेवा हक्क अध्यादेशामध्ये करण्यात आला आहे. या अध्यादेशाची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षामार्फत संबंधित ग्रामसेवकांकडून विविध १३ प्रकारचे दाखल्यांचे वितरण ग्रामस्थांना करण्यात येणार आहे.हे मिळणार दाखले...जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला, रहिवासी दाखला, दरिद्र्यरेषेखालील दाखला, हयात असल्याचा दाखला, ग्रामपंचायत देणी बाकी असल्याचा दाखला, शौचालय असल्याचा दाखला, नमुना-८, निराधार असल्याचा दाखला, विधवा, परित्यक्ता व विभक्त कुटुंब दाखला आदी.
ग्रामपंचायत स्तरावर मिळणार १३ दाखले!
By admin | Updated: September 19, 2015 22:35 IST