पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर १२ फेब्रुवारीला निकाल
By Admin | Updated: February 7, 2016 02:42 IST2016-02-07T02:42:58+5:302016-02-07T02:42:58+5:30
शीना बोरा हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर १२ फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालय निर्णय घेणार आहे. गेल्या सुनावणीवेळी पीटरच्या न्यायालयीन

पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर १२ फेब्रुवारीला निकाल
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर १२ फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालय निर्णय घेणार आहे. गेल्या सुनावणीवेळी पीटरच्या न्यायालयीन कोठडीत ८ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शीनाच्या हत्येची पूर्वकल्पना पीटरला होती. तिच्या हत्येपूर्वी आणि त्यानंतर तो सतत इंद्राणीच्या संपर्कात होता. तसेच पीटर त्याचा मुलगा
राहुल याच्याशी शीनाविषयी खोटे
बोलला. पीटरने त्याच्यावरील आरोप
फेटाळत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
शीनाच्या हत्येविषयी आपल्याला काहीही माहीत नाही, असा दावा पीटरने जामीन अर्जात केला आहे.
मात्र सीबीआयने या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. पीटरला शीनाच्या हत्येची कल्पना होती. तो मोठा व्यावसायिक असून, त्याची जामिनावर सुटका केली तर तो फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयापुढे केला.
न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय १२ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे. (प्रतिनिधी)