१२ वाईनची टेस्ट केल्याने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: January 22, 2016 20:27 IST2016-01-22T20:27:12+5:302016-01-22T20:27:12+5:30
मुंबईतील खारमध्ये असलेल्या येल्लो बार ऑल डे मधील एकाचा १२ वाईन्सची टेस्ट केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. पुर्खीमयुम अख्तर हुसैन असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

१२ वाईनची टेस्ट केल्याने एकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबईतील खारमध्ये असलेल्या येल्लो बार ऑल डे मधील एकाचा १२ वेगवेगळ्या वाईनची टेस्ट केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. पुर्खीमयुम अख्तर हुसैन असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
पुर्खीमयूम अख्तर हुसैनने येथील एका वाईन टेस्टिंग वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्याने १० वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन टेस्ट केल्या आणि वर्कशॉप बंद झाल्यावर फुल एक ग्लॉस वाईन रिचवली असे, त्याच्या मित्राने सांगितले.
त्यानंतर हुसैन येल्लो बार ऑल डेच्या गेटसमोर नशेत दिसून येताच, गेटवरील सुरक्षा रक्षकांनी बारच्या मॅनेजरला कळविले. मॅनेजर आल्यानंतर हुसैनला भाभा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मृत्यूचा गुन्हा नोंद होण्यास उशीर झाल्यामुळे अद्याप पोस्टमार्टम करण्यात आला नसून रासायनिक प्रक्रियामुऴे विष तयार झाल्यामुळे हुसैनचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज फॉरेन्सिक अधिका-यांनी वर्तविला आहे.
याप्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास करत आहेत.