राष्ट्रवादीला 124 जागा!

By Admin | Updated: July 30, 2014 02:14 IST2014-07-30T02:14:07+5:302014-07-30T02:14:07+5:30

जागावाटपावरून राष्ट्रवादीने कितीही इशारे दिले तरी त्यांना 124 पेक्षा अधिक जागा देण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले

124 seats for NCP! | राष्ट्रवादीला 124 जागा!

राष्ट्रवादीला 124 जागा!

मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीने कितीही इशारे दिले तरी त्यांना 124 पेक्षा अधिक जागा देण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले असून विधानसभा निवडणुकीत आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच असेल, असे त्यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निम्या जागा (288 पैकी 144) लढविण्याची भाषा करत प्रसंगी स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचे  सांगत आहेत. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, जागा वाटपात थोडे बदल होऊ शकतात. 2क्क्4 मध्ये त्यांनी 124 जागा लढविल्या होत्या, मात्र 2क्क्9 मध्ये लोकसभा निवडणुकीतील यशाचा निकष लावल्यावर त्यांच्या वाटय़ाला 114 जागा आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत 2क्क्4 च्या सूत्रचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले. 
दोन्ही पक्षांमध्ये जागांची अदलाबदल होईल, असे सांगून चव्हाण म्हणाले, मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत अशा तीसएक जागा आहेत. त्यापैकी जिथे राष्ट्रवादीकडे चांगला उमेदवार असेल, तर त्या जागा त्यांना देण्याचा विचार केला जाऊ शकतो. याउलट त्यांनी आजवर न जिंकलेल्या जागा कॉंग्रेसकडे येऊ शकतात.
 विद्यमान आमदारांना डावलून नव्यांना संधी देईल, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 26 पैकी 14 चेहरे बदलले, पण त्याचा फायदा झाला नाही. उमेदवार बदलल्याने फायदा होतोच असे नाही. आघाडी सरकारची कामगिरी, विकास कामांना दिलेली चालना, अनेक महत्त्वाचे निर्णय या मुद्यांवर 
निवडणूक लढवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
युतीला पसंती नाही
मुंबई, ठाणो महापालिकेत वर्षानुवर्षे सत्ता असूनही शिवसेनेला फारसे 
काही करता आले नाही, हे सर्वासमोर आहेच. त्यामुळे मतदार विधानसभेत युतीला पसंती देणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 
राणो मंत्री आहेतच
नारायण राणो यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार असे विचारले असता, राणो आजही माङो मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत मी योग्य वेळी निर्णय घेईन, असे  मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title: 124 seats for NCP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.