अमरावतीत स्वाइन फ्लूचे १२४ रुग्ण
By Admin | Updated: February 17, 2015 01:38 IST2015-02-17T01:38:15+5:302015-02-17T01:38:15+5:30
महिनाभरात चार जणांचा बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूचे आणखी १२४ संशयित रुग्ण अमरावतीमध्ये आढळून आले आहेत़

अमरावतीत स्वाइन फ्लूचे १२४ रुग्ण
अमरावती : महिनाभरात चार जणांचा बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूचे आणखी १२४ संशयित रुग्ण अमरावतीमध्ये आढळून आले आहेत़
जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. पैकी १२४ रुग्णांना टॅमी फ्लू या औषधीच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आला आहे. १८ रुग्णांच्या घशातील थुंकीचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
इर्विन रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या इलाजासाठी १३ रुग्णांना दाखल करण्यात आले. सोमवारी पुन्हा पाच रुग्ण दाखल झालेत. अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांतील एकूण ५१२ रुग्णांची स्क्रीन टेस्ट करण्यात आली. पैकी १९६ रुग्णांना स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर टॅमी फ्लूचा इलाज सुरू करण्यात आला. या रुग्णांवर डॉक्टरांची सतत देखरेख आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)