अकरावीचे १,२२८ विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत

By Admin | Updated: July 13, 2016 03:35 IST2016-07-13T03:35:28+5:302016-07-13T03:35:28+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली.

1,228 students of eleventh wait for admission | अकरावीचे १,२२८ विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत

अकरावीचे १,२२८ विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत १४ हजार ७३९ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, अद्याप १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, तिसऱ्या यादीअखेरही कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफ ९० टक्क्यांपलीकडेच स्थिरावला आहे.
दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करताना २२ हजार ४६८ नव्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र उरलेल्या १५ हजार ६५२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र तिसऱ्या यादीनंतरही १ हजार २२८ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला चौथी यादी लावावी लागणार आहे.
तिसऱ्या यादीत २७ हजार १७९ विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळालेले आहे; शिवाय आणखी १० हजार ३९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले आहे. तर ६ हजार २३० विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि ४ हजार २३३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली.

बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आॅनलाइन प्रवेश रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिला प्रवेश रद्द केल्यानंतरच पुन्हा प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तो निश्चित करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १३ व १४ जुलैचा कालावधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्याचे नाव कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आले नसेल, त्यांनी पुढच्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

तिसऱ्या यादीअखेर उरलेल्या १ हजार २२८ विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैला चौथी यादी जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन शिक्षण सहायक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी केले.

तिसऱ्या गुणवत्ता यादीमधील बोर्डनिहाय व शाखानिहाय प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या -
बोर्ड कलावाणिज्यविज्ञानएकूण
एसएससी ९४३२४,५३६१४,५२८४०,००७
सीबीएसई ६५२४५४१६७२६
आयसीएसई ११२४१७३१५८४४
आयबी ००००
आयजीसीएसई१२६४५८१३४
एनआयओएस०५६२०८७५
इतर ०२७२५८१३२
एकूण १,१३९२५,३९६१५,३८३४१,९१८


तिसऱ्या यादीचे कट-आॅफ
दक्षिण मुंबई -
महाविद्यालयाचे नाव कलावाणिज्यविज्ञान
सेंट झेविअर्स महाविद्यालय९४.००—-८९.२०
एच. आर. महाविद्यालय —-९२.४०—-
जयहिंद महाविद्यालय ८७.४०८७.८३८२.८०
के. सी. महाविद्यालय ८३.४०८८.४०८५.२०
रुईया महाविद्यालय ९१.२०—-९२.६०
आर. ए. पोद्दार महाविद्यालय—-९०.६०—-
रुपारेल महाविद्यालय ८३.४०८७.४०९१.००
पश्चिम मुंबई -
महाविद्यालयाचे नाव कलावाणिज्यविज्ञान
भवन्स महाविद्यालय ३६.८०८४.००८४.६०
साठ्ये महाविद्यालय ३६.६०८५.४०९०.००
एम. एल. डाहाणूकर महाविद्यालय—-८७.६०—-
मिठीबाई महाविद्यालय ८३.४०८८.००८५.००
एन. एम. महाविद्यालय —-९२.२९—-
उत्तर मुंबई -
महाविद्यालयाचे नाव कलावाणिज्यविज्ञान
के.जे. सोमय्या महाविद्यालय—-८५.००८९.२०
वझे केळकर महाविद्यालय८३.००८९.००९२.४०
एम. सी. सी. महाविद्यालय—-९०.२०—-
ठाणे जिल्हा -
महाविद्यालयाचे नाव कलावाणिज्यविज्ञान
बेडेकर महाविद्यालय ६२.००८५.८०—-
बांदोडकर महाविद्यालय —-—-९२.००
बिर्ला महाविद्यालय ४०.४०८१.६०९०.६०
सी. एच. एम महाविद्यालय—-७९.००९०.००

Web Title: 1,228 students of eleventh wait for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.