स्वाइनचे राज्यात २४ तासांत १२ बळी
By Admin | Updated: March 21, 2015 02:04 IST2015-03-21T02:04:28+5:302015-03-21T02:04:28+5:30
राज्यात गुरुवारी स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले

स्वाइनचे राज्यात २४ तासांत १२ बळी
पुणे : राज्यात गुरुवारी स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले असून, या रुग्णांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ हजार जणांची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना औषध देण्यात आले. ३६७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यू
बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.