तलावांमध्ये १२ टक्के जलसाठा
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़

तलावांमध्ये १२ टक्के जलसाठा
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ आणखी एक महिना हा जलसाठा मुंबईला पुरेल़ त्यानंतर मात्र, पाणीपुरवठ्यासाठी पालिकेची मदार पावसावर असणार आहे़ त्यामुळे मान्सूनचा अंदाज घेऊन पाणीकपात वाढविण्याबाबत निर्णय होणार
आहे़
गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे मुंबईत वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरू आहे़ त्यामुळे
दररोज ३,७५० ऐवजी ३,२०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू आहे़ या बचतीमुळे अद्याप तलावांमध्ये दीड लाख दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे़ याचा आढावा पालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला़
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते़ गेल्या वर्षी जेमतेम १२ लाख दशलक्ष लीटर जलसाठाच तयार झाला़ आज तलावांमध्ये असलेला जलसाठा हा आणखी महिनाभर
पुरेसा आहे़ त्यानंतर मात्र,
पावसाला सुरुवात न झाल्यास मुंबईवरील पाणीसंकट वाढणार
आहे़ (प्रतिनिधी)
मुंबईत गेले वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरू आहे़ त्यामुळे
दररोज ३,७५० ऐवजी ३,२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला.